Pune News : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे उच्चशिक्षित युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Rabies death after dog bite in Maharashtra : खामगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज झाल्याने ३० वर्षीय उच्चशिक्षित युवकाचा मृत्यू झाला. उपचार पूर्ण करूनही उशिरा लक्षणे दिसल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
Rabies death after dog bite in Maharashtra

Rabies death after dog bite in Maharashtra

sakal

Updated on

खुटबाव : येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीज आजाराने एका उच्चशिक्षित युवकाला आपला जीव गमवावा लागला. खामगाव परिसरातील गाडीमोडी रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. ते दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लेखापाल म्हणून काम करत होता. मितभाषी, संयमी, हसतमुख महेशच्या मृत्यूने खामगाव परिसरात दुखवटा व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com