रचना हांडे अर्थशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रचना हांडे

रचना हांडे अर्थशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रथम

नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कला शाखेतील अर्थशास्त्र विभागातील रचना सुभाष हांडे ही विद्यार्थीनी एम. ए. (अर्थशास्त्र ) परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आली. विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या श्री यशवंतराव चव्हाण स्मृती सुवर्ण पदक, इंदिराबाई कुलकर्णी सुवर्ण पदक व विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर सुवर्णपदक या तीनही सुवर्ण पदकाची रचना हांडे मानकरी ठरली, अशी माहिती प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली.

या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक डॉ. आनंद कुलकर्णी, अरविंद मेहेर, प्राचार्य शेवाळे यांनी रचना हांडे हिचे अभिनंदन केले आहे. अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, उपप्राचार्य प्रा. जी. बी. होले, प्रा.आकाश कांबळे, प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्रा. गजानन जगताप यांनी रचना हांडे हिला मार्गदर्शन केले.

या बाबत प्राचार्य शेवाळे म्हणाले ग्रामोन्नती मंडळाच्यावतीने महाविद्यालयात सन २००४ पासून अर्थशास्त्र विभाग सुरू केला. महाविद्यालयात तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी सुविधा असून अभ्यासासाठी निसर्गरम्य परिसर आहे. या सुविधांचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

Web Title: Rachna Hande Standard Three Gold Midal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top