
Baner Traffic
Sakal
औंध : बाणेर-महाळुंगे रस्त्यावरील राधा चौकात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. यावर वाहतूक विभागाकडून अनेक उपाययोजना करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने नोकरदारांना कामावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वाहतूक विभागाने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करून वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.