Pune News : विखे पाटलांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी, आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदासह मंत्रिपदाचाही विखे पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चाने शनिवारी पुण्यात केली.
maratha kranti morcha

maratha kranti morcha

sakal

Updated on: 

पुणे - मराठा आरक्षणासह सारथी, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या प्रश्नांवर समाजातील अभ्यासक व प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली जात नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदासह मंत्रिपदाचाही त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चाने शनिवारी पुण्यात केली. तसेच, आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेऊन राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com