A.R. Rahman : आपण सर्वांनी स्टेवरचा "रॉकस्टार' क्षण अनुभवला का ?

पुणेकरांच्या प्रतिसादाबद्दल रेहमान यांच्याकडून आनंद व्यक्त, पुणे पोलिसांवर खोचक टिका, तर "शास्त्रीय संगीताच्या माहेरघरी पुन्हा येण्याचे आश्‍वासन
Rahman expressed happiness response of Pune residents criticized Pune police classical music
Rahman expressed happiness response of Pune residents criticized Pune police classical musicEsakal

पुणे : "काल आपण सर्वांनी काल स्टेजवर "रॉकस्टार' क्षण अनुभवला होता का ? आम्ही तो क्षण अनुभवला. प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही अक्षरशः भारावुन गेलो आणि प्रेक्षकांना आणखी काही देण्याची इच्छा यापुढे राहील. "पुणे' अशा अविस्मरणीय संध्याकाळसाठी पुन्हा एकदा धन्यवाद.''

अशा ट्विटद्वारे संगीतकार ए.आर.रेहमान यांनी पुणेकरांबाबत गौरवोद्‌गार काढत, पुणे पोलिसांवरही नकळत व खोचक टिका केली आहे. तसेच "शास्त्रीय संगीताचे माहेरघर पुणे ! आम्ही लवकरच गाण्यासाठी पुन्हा येऊ' अशा शब्दही पुणेकरांना दिला आहे.

संगीतकार रेहमान यांच्या रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात रात्री 10 वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरु ठेवत वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद केला.

या घटनेनंतर रेहमान हे कार्यक्रमातून निघून गेले. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी रेहमान यांनी पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याबरोबरच घडलेल्या प्रकाराबाबतही अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली आहे.स

संगीतकार रेहमान यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. त्यामध्ये रेहमान हे गात असतानाच पोलिस अधिकारी कार्यक्रम बंद करण्यास सांगत असल्याचे स्पष्ट होत आहे. रेहमान यांनी त्यावर ""काल आपण सर्वांनी स्टेजवर "रॉकस्टार' क्षण अनुभवला होता का ? आम्ही तो क्षण अनुभवला.

प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही भारावुन गेलो आणि प्रेक्षकांना आणखी काही देण्याची इच्छा यापुढे राहील. "पुणे' अशा अविस्मरणीय संध्याकाळसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्या रोलर कोस्टर राईडचा हा एक भाग आहे.'' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेकडे लक्ष वेधले आहे.

""काल रात्री तुम्ही दिलेल्या उदंड प्रेम व उत्साहाबद्दल धन्यवाद. शास्त्रीय संगीताचे माहेरघर म्हणजे पुणे. आम्ही लवकरच तुमच्यासोबत गाण्यासाठी परत येऊ'' असा आत्मविश्‍वासही रेहमान यांनी आपल्या ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com