भाजुपची टीका

भाजुपची टीका
Published on

राहुल यांची मानसिकता अराजकतावादी
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपने बुधवारी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस नेत्यांची विधाने त्यांच्या अराजकवादी मानसिकतेचे आणि स्वभावाचे प्रतिबिंब असल्याचा दावा भाजपने केला. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे देशातील १४० कोटी जनतेचा अपमान असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे अध्यक्ष नीतीन नवीन यांनी केली. ‘‘त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागत असल्याने निर्माण झालेली निराशा आणि हतबलताही या वक्तव्यातून दिसते. मला असेही वाटते की ते मानसिक संतुलन गमावत आहेत’’ असे नवीन म्हणाले.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वर गांधी यांचा वादग्रस्त विधान केलेला व्हिडिओ शेअर करत, गांधी यांच्या वक्तव्यांतून ‘शहरी नक्षलवाद्यांची’ मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप केला. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते देशाच्या हिताविरोधात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘‘त्यांची भाषा ही अशा शहरी नक्षलवाद्यांची आहे, ज्यांना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एकसंध झाल्याने चीड आणि राग आला आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वीही भारतीय राष्ट्रव्यवस्थेशी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती,’’ असा आरोप भंडारी यांनी केला. तसेच गांधी यांची भाषा ‘पाकिस्तानातील दहशतवाद्यांसारखी’ असल्याचाही आरोप त्यांनी केला. राहुल गांधी हे भारतविरोधी शक्तींचा अजेंडा पुढे नेत असल्याचे ते म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com