
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दावा दाखल करणाऱ्या सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधींच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयात दाखल केला.