Rahul gandhi and Chitra Wagh
sakal
पुणे - पितृसत्ताक व्यवस्थेवर सातत्याने टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी हेच या व्यवस्थेचे खरे लाभार्थी आहेत, असा घणाघाती आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी केला. प्रियंका गांधी या राहुल गांधींपेक्षा अधिक सक्षम असतानाही काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधींकडे सोपविण्यात आले. त्यामुळे काँग्रेसमधील नेतृत्वाची वाटचालही पुरुषप्रधान मानसिकतेतूनच झाल्याचे त्यांनी सुनावले.