मुलींचा आवाज ऐकण्यासाठी राहुल गांधी पुण्यात येणार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

मुलींचा आवाज ऐकण्यासाठी
राहुल गांधी पुण्यात येणार 
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती
Published on

पुणे, ता. १९ : ‘‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात मुलींचा आवाज ऐकला गेला पाहिजे. पेपरफुटीसह मुलींच्या काही समस्या आहेत. या लेकींचा आवाज ऐकण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे,’’ अशी माहिती माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महिलांच्या प्रगतीबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आक्षेप असू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राजस्थानच्या माजी मंत्री रेहाना चिस्ती, माजी मंत्री सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, के. बी. बैजु, मनोज त्यागी, प्रवक्ते अतुल लोंढे, गोपाळ तिवारी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या, ‘‘या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुलींनी नोंदणी केली आहे. मुलींना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे.’’

नोंदणी आणि थेटही प्रवेश मिळणार...
‘‘विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत. पोलिसांची परवानगी मिळाली आहे. त्यानंतरही आम्ही पोलिसांची भेट घेतली आहे. कार्यक्रमासाठी समाजमाध्यमांद्वारे नोंदणी करता येत आहे. मात्र, नोंदणी न करताही थेट आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची परवानगी असेल,’’ असे सतेज पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com