Satyaki Savarkar addressing the media after filing a legal petition against Rahul Gandhi over remarks on Veer Savarkar.esakal
पुणे
Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ? स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामीप्रकरणी सात्यकी सावरकरांची न्यायालयाकडे मोठी मागणी
Veer Savarkar : गांधींच्या वतीने वकील मिलिंद पवार २८ मे रोजी न्यायालयात उत्तर देणार आहेत. दरम्यान, गांधी यांच्या वकिलांनी सावरकर लिखित पुस्तकांची इंग्रजी आवृत्ती व वादग्रस्त भाषणाचा पेन ड्राइव्ह न्यायालयात मागवला होता, जो सावरकर पक्षाने सुपूर्त केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कथित बदनामीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केली आहे. राहुल गांधी यांनी याचिकेवर म्हणणे नोंदविणे टाळल्याचा आरोपही त्यांनी केला.