
मंचर : येथील कृषितज्ज्ञ अँड राहुल पडवळ यांनी नैरोबी (केनिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय AICAD परिसंवादात भारताचे प्रतिनिधित्व करत सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संतुलनावर प्रभावी सादरीकरण केले.पूर्व आफ्रिकेतील उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरू आणि तज्ञांपुढे शाश्वत शेतीत भारताचे प्रयोग कसे दिशादर्शक ठरू शकतात हे त्यांनी सांगितले.