esakal | 'स्वच्छ भारत अभियान' समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राहुल शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल शेवाळे

'स्वच्छ भारत अभियान' समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राहुल शेवाळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हडपसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकलपनेतून साकारलेल्या "स्वच्छ भारत अभियान' समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानचे राष्ट्रीय संयोजक खासदार यशवंत सिंह दरबार यांच्या हस्ते व बेटी बचाव, बेटी पढावचे प्रमुख राजेन्द्र फडके, सल्युट तिरंगाचे प्रमुख राजेश झा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळे यांना त्याबाबतचे पत्र देण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष मच्छिंद्र दगडे पाटील, प्रदेश संयोजक सचिन देशपांडे, विजय कुलकर्णी, वैभव मुरकुटे, कांचन कुंबरे, स्वप्नील शहा, किरण दगडे, प्रसाद सरमोदक आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

या समिती अंतर्गत नद्यांसह वेगवेगळ्या जलस्रोतांचे संवर्धन व स्वच्छता, स्रियांसाठी स्वचछतागृहांची निर्मिती, सॅनिटरी नॅपकिन्सचे निर्मूलन, दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन, गड किल्ल्यांचे संवर्धन व स्वच्छता, बेटी बचाओ-बेटी पढाओ यासाठी प्राधान्याने काम केले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक निधीची तरतूद केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. देहू, आळंदी, तुळापूर अशा विविध तीर्थक्षेत्रातून त्या पुढे जात आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे त्या अनेक ठिकाणी दूषित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून भिमा, भामा, इंद्रायणी सारख्या नद्या वाहत आहेत. त्यांचे शुध्दीकरण, तरूणांचे प्रेरणास्रोत असलेले छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणी, असलेल्या स्मारकांची डागडूजी, देखभाल व सुरक्षा, शिवनेरी, पुरंदरसह विविध गडकिल्ल्यांचे संवर्धन व स्वच्छता, स्रिया व मुलिंचे आरोग्य व शिक्षण याबाबत प्रामुख्याने आपण येत्या काळात काम करणार असल्याचे "स्वच्छ भारत अभियान' चे नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top