

Rayreshwar Plateau Wildflowers Bloom In Full Glory As Nature Lovers Flock To Witness The Scenic Beauty Near Pune
sakal
हिर्डोशी : भोरपासून २८ किलोमीटर अंतरावरील किल्ले रायरेश्वर (ता. भोर) येथील पठार हिरव्यागार वेलींनी तसेच दुर्मीळ कोमल, विविधरंगी फुलांच्या गालिच्याने फुलू लागले आहे. मनमोहक फुलांनी बहरत असलेल्या पठारावरील अद्भुत निसर्गसौंदर्य पर्यटकांना साद घालत आहे.