लॉकडाउनच्या काळात पुण्यातून रेल्वे, विमान वाहतूक सुरू राहणार का? जाणुन घ्या

Rail and air services will continue from Pune during the lockdown
Rail and air services will continue from Pune during the lockdown

पुणे : पुण्यात दोन दिवसांनंतर सुरू होणाऱया लॉकडाउनच्या काळात शहरातून होणारी विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत राहणार आहे. तसेच लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना रिक्षा सेवाही उपलब्ध राहणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनाच्या रुग्णांचा उद्रेक झाल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने 14 ते 23 जुलै पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउन घोषित केला आहे. हा लॉकड़ाउन कडक असेल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळ प्रशासनाकडे चौकशी केली असता, देशात 26 मे पासून ठराविक ठिकाणांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पुण्यातूनही दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, प्रयागराज आदी 8 शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पुण्यातील लॉकडाउन हा लोकल स्वरूपाचा निर्णय आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याच धर्तीवर रेल्वेचीही 1 जूनपासून देशात 200 मार्गांवर वाहतूक सुरू झाली आहे. त्यात पुण्यातून ये- जा करणाऱया गाड्यांचाही समावेश आहे. पुण्यातील लॉकडाऊनचा या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क मनोज झंवर यांनी स्पष्ट केले. 

पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

विमानतळावर जाण्यासाठी शहरातून 9859198591 या क्रमांकावर रिक्षा मिळेल. तसेच तेथे कॅब आणि प्री-पेड रिक्षालाही परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली. प्रवाशांनी विमानाचे तिकिट किंवा बोर्डिंग पास जवळ बाळगावेत, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकावरूनही वर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरून प्रवाशांना रिक्षा मिळणार आहे. रेल्वे प्रवासांनीही प्रवासाचे तिकिट किंवा मेजेज जवळ बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. विमान प्रवासासाठी किमान तीन तास आधी तर रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना किमान तास अगोदर पोचावे लागणार आहे. त्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर पुरेशी तयारी करण्यात आली आहे, असेही विमानतळ आणि रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षा प्रवासासाठी मीटरच्या दराच्या दुप्पट पैसे रिक्षाचालकाला द्यावे लागतात. म्हणजे मीटरवर 100 रुपये झाले असतील तर, प्रवाशाला 200 रुपये द्यावे लागतील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउऩच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 387 रिक्षांना पोलिसांनी पास दिले होते. त्या काळात चालकांना 22 हजार फेऱयांतून सुमारे 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता या काळात रिक्षांची संख्या वाढविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com