esakal | नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीवर अत्याचार

नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट: पुणे रेल्वे स्थानक परिसरात मागिल आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर आठ नराधमांनी अत्याचार केल्याच्या घटनेने पुण्याची प्रतिमा मलीन झाली आहे. रेल्वे प्रशासनाने महिला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात. माणुसकीला काळीमा फासणारी घटना भविष्यात होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी व्यक्त केले.

भाजपचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार, दि. ७) पुणे रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकातील सुरक्षेसंबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यात आले.

डीआरए युसीसी मेंबर आणि अल्पसंख्यांक मोर्चा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सलीम शेख यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महिला अध्यक्ष मीनाज शेख, अमरीन शेख, उपाध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक मोर्चा पुणे शहर, सरचिटणीस फातिमा शेख, उपाध्यक्ष मैमुना शेख, महिला आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष जाकीर शेख, चिटणीस अहमद शेख, सिद्धू गोसावी, गणेश यादव, माजी अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

अन्वर पठाण म्हणाले की, सांस्कृतिक पुण्यामध्ये महिलांवरील अत्याच्याराच्या घटना अशा घडू लागल्यामुळे पुणे आहे की बिहार आहे, असा प्रश्न सामान्यांना सतावू लागला आहे. रेल्वे पोलीस यंत्रणेने नारी सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, असे रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top