प्ररप्रांतीय मजूरांसाठी 'उरुळी'मधून काय आहेत सुविधा? वाचा सविस्तर बातमी

uruli.jpg
uruli.jpg
Updated on

लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हातील
परप्रांतीय कामगार व मजूरांना, त्यांच्या मुळ राज्यात रेल्वेने परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशनची निवड केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर, पुढील काही दिवसांत उरुळी कांचनहून परराज्यात कामगार घेऊन जाणार्या रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दिली. 

दरम्यान, परराज्यात जाण्य़ासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळालेल्या परप्रांतीय कामगार व मजूरांनाच, प्रशासनाच्या नियोजनानुसार ते राहत असलेल्या सध्याच्या ठिकाणावरुन उरुळी कांचनला प्रवाशी बसमधून आणले जाणार आहे. उरुळी कांचन येथे कामगार पोहचल्यानंतरच रेल्वे सोडण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शासनाच्या आदेशानुसार पुढील काही दिवसांत परप्रांतीय कामगार व मजूरांना त्यांच्या मुळ राज्यात परतण्यासाठी कामगारांची संख्या व रेल्वे ची उपलब्धतता यांची सांगड घालून राज्य निहाय विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.

रेल्वेने कामगारांना परत पाठवताना, पुणे रेल्वे स्टेशनवर कामगारांची गर्दी टाळण्यासाठी उरुळी कांचन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन करण्यासाठी विजयसिंह देशमुख यांनी उरुळी कांचनला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना देशमुख यांनी वरील माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना विजयसिंह देशमुख म्हणाले, केवळ जिल्हा प्रशासनाने नोंद घेतलेल्या परप्रांतीयांना कामगारांना रेल्वेने पाठवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेल्या कामगारांना, कामगार राहत असलेल्या जिल्हा व शहराच्या विविध ठिकाणाहून प्रवाशी बसमधून उरुळी कांचन येथे आणण्यात येणार आहे. बसमधून कामगार उतरचाच, संबधित कामगारांची प्राथमिक तपासणी करुन संबधितांना तात्काळ रेल्वेत बसविण्यात येणार आहे. हे करत असताना उरुळी कांचन ग्रामस्थांना कसलाही त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात येणार आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार विवेक जाधव, मंडल अधिकारी दिपक चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच जितेंद्र बडेकर, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य देविदास टिळेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com