esakal | लॉकडाउनमध्येही बँकांच्या शेअरमध्ये आली तेजी; बाजारात घसरणीला लागला 'ब्रेक'!
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे 16 पैशांनी अवमूल्यन होऊन रुपया 75.76 प्रतिडॉलर पातळीवर स्थिरावला.

लॉकडाउनमध्येही बँकांच्या शेअरमध्ये आली तेजी; बाजारात घसरणीला लागला 'ब्रेक'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीने बुधवारी (ता.६) घसरणीला 'ब्रेक' लागला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 232 अंशांनी वधारून 31 हजार 686 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 65 अंशांची वाढ झाली. तो 9 हजार 270 पातळीवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन सत्रातील घसरणीला 'ब्रेक' लागत दिवसभर अस्थिर व्यवहार करत असलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र सकारात्मक पातळीवर बंद झाला. लॉकडाउन संपविण्याबाबत विविध देशांमध्ये संभ्रम कायम आहे. तसेच अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या शेअर बाजारात संमिश्र स्वरूपात व्यवहार सुरू होते. गुंतवणूकदारांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्य सरकारच्या नवीन भरती न करण्याच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना झटका

क्षेत्रीय पातळीवर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ऑटो निर्देशांकांमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर एफएमसीजी आणि सार्वजनिक बँकांचा निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्सच्या मंचावर महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि हिरोमोटोकॉर्पचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, इन्फोसिस, टायटन आणि नेस्लेच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली होती.

- पुण्यातल्या सर्वांत मोठ्या झोपडपट्टीने दिली कोरोनाला जबरदस्त टक्कर!

मद्य उत्पादक कंपन्यांचे शेअर घसरले

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांनी मद्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क लागू केल्याने तसेच मद्यविक्री सुरु ठेवण्याबाबत स्पष्टता नसल्याने मद्य उत्पादक कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परिणामी युनायटेड ब्रेव्हरीज, रेडिको खेतान, युनायटेड स्पिरिट्स, जीएम ब्रिव्हरीज, असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रेव्हरीज आणि ग्लोबल स्पिरिट्सच्या शेअरमध्ये 3 ते 7 टक्क्यांची घसरले होते.

- तुम्हाला माहित आहे का? पुण्यात दारु मिळविण्यासाठी मिळताहेत पैसै

रुपयात पुन्हा घसरण

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे 16 पैशांनी अवमूल्यन होऊन रुपया 75.76 प्रतिडॉलर पातळीवर स्थिरावला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा