Railway Police Crime Branch Cracks Major Theft Case
पुणे : रेल्वे प्रवाशांना त्यांच्या बॅगा उतरवण्यास मदत करण्याचा बहाणा करत, नजर चुकवून पिशवी व पर्समधील मौल्यवान दागिने चोरी करणाऱ्या हरियानातील आंतरराज्यीय टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांना दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून मिरज रेल्वे स्थानकावर दोन गुन्ह्यात सोने व हिरेजडित दागिने असा ४० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.