रेल्वे पोलिस भरती वृत्तात तथ्य नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

रेल्वे पोलिस दलात (आरपीएफ) पोलिस कर्मचारी या पदाच्या भरतीचा प्रस्ताव नाही. भरती जाहीर झाली तर त्याची अधिकृत माहिती रेल्वे पोलिसांच्या वेबसाइटवर असेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

पुणे - रेल्वे पोलिस दलात (आरपीएफ) पोलिस कर्मचारी या पदाच्या भरतीचा प्रस्ताव नाही. भरती जाहीर झाली तर त्याची अधिकृत माहिती रेल्वे पोलिसांच्या वेबसाइटवर असेल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे पोलिस दलात कर्मचारी पदाच्या 19 हजार 952 जागांसाठी भरती होणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वे पोलिस दलात पोलिस कर्मचारी पदासाठी भरती होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली. अर्ज करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तसेच रेल्वे पोलिसांच्या मुंबई, पुणे कार्यालयातही चौकशीसाठी दूरध्वनी येत आहेत. या बाबत रेल्वे मंडळातील पोलिस उपमहानिरीक्षक संतोष चंद्रन म्हणाले, ""पोलिस भरती होणार असल्याचे वृत्त अथवा पोस्ट तथ्यहीन आहे. ज्या संकेतस्थळावरून पोस्ट व्हायरल झाली आहे, त्याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच संकेतस्थळाबाबत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. त्या संकेतस्थळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रेल्वे पोलिसांनी केली आहे.'' रेल्वे पोलिस दलात भरतीचा तपशील रेल्वे आणि रेल्वे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिला जातो. तसेच युवकांनी भरतीसाठी कोणत्याही संस्थेला, व्यक्तीला आधार क्रमांक, बॅंक खात्याचे तपशील आणि वैयक्तिक माहिती देऊ नये. त्यामुळे नुकसान झाल्यास रेल्वे पोलिस जबाबदार नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway police recruitment