का राहणार रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

रद्द केलेल्या गाड्या
५१०२९    मुंबई-विजापूर पॅसेंजर
५१०३०    विजापूर-मुंबई पॅसेंजर
५१३१७    पनवेल-पुणे पॅसेंजर
५१३१८    पुणे-पनवेल पॅसेंजर

दौंड-मनमाडमार्गे वळविलेल्या गाड्या
११०२५    भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस
११०२६    पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस

पुण्यापर्यंत धावणाऱ्या गाड्या 
(या गाड्या ३१ डिसेंबर व २ जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील.)

११०३०    कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस
१७३१७    हुबळी-एलटीटी एक्‍स्प्रेस
१२७०२    हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस
१८५१९    विशाखापट्टणम-एलटीटी एक्‍स्प्रेस
१७६१४    नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस
०७६१७    नांदेड-पनवेल साप्ताहिक

पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या 
११०२९    कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस
१७३१८    हुबळी-एलटीटी एक्‍स्प्रेस
१२७०१    हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस
१८५२०    विशाखापट्टणम-एलटीटी एक्‍स्प्रेस
१७६१३    नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेस
०७६१८    नांदेड-पनवेल साप्ताहिक

लोणावळा - लोणावळा ते कर्जतदरम्यान बोरघाटात मंकी हिल ते नागनाथ केबिनदरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेसेवा ३१ डिसेंबरपर्यंत विस्कळितच राहणार आहे. रेल्वेच्या वतीने पाच गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्या असून, काही गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत, तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

घाट सेक्‍शनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ केबिनदरम्यान रेल्वेच्या ‘अप’ लाइनवरील रेल्वे किलोमीटर क्रमांक ११७ जवळ रेल्वेच्या बोगदा क्र. ४६ पुढील पुलाचा भराव खचला आहे. बोरघाट सुरक्षित करीत बोरघाटातील रेल्वेसेवा १५ जानेवारीपर्यंत शंभर टक्के सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वेच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या लोणावळा ते कर्जतदरम्यान बोरघाटात ‘अप’ लाइनवरील वाहतूक पूर्ण बंद असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘मिडल’ आणि ‘डाऊन’ लाइनने वळविली आहे. या मार्गावर वाहतूक वाढल्याने रेल्वेच्या वतीने लांब पल्ल्याच्या पाच गाड्या रद्द करॅंयात आल्या असून, काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे. मुंबई-पंढरपूर ही गाडी २८ डिसेंबरला, तर पंढरपूर-मुंबई पॅसेंजर ही २९ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway service disturb to 31st december