Pune Mumbai Expressway Accident : मुंबई गाठण्यासाठी रेल्वेचा आधार; बारा हजारांहून अधिक प्रवाशांचा जागा नसल्याने उभे राहून प्रवास

द्रुतगती मार्गावर अडकून पडण्याऐवजी प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली. परिणामी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
pune railway station crowd

pune railway station crowd

sakal

Updated on

पुणे - द्रुतगती मार्गावर अडकून पडण्याऐवजी प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली. परिणामी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. बुधवारी सुमारे १२ हजारांहून अधिक प्रवाशांनी अनारक्षित (जनरल) तिकीट काढून मुंबई गाठली. आरक्षित व अनारक्षित डब्यात बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com