
पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारीही (ता. २६) उपस्थिती नोंदवली. पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने रविवारी (ता. २७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.