पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरींची हजेरी | Rain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain
पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरींची हजेरी

पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरींची हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात शनिवारी दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामान कायम होते. त्यानंतर सायंकाळी पाऊस पडला. तर येत्या मंगळवारपर्यंत (ता. २३) शहरात अशीच स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ढगाळ हवामानामुळे सध्या शहरातून थंडीने पळ काढला असून सरासरीच्या तुलनेत किमान तापमान हे ७ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदले गेले. शहरात २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुणेकरांना निदान पुढील चार दिवस थंडीची प्रतिक्षा करावी लागेल. शुक्रवारनंतर (ता. २६) शहर व परिसरातील आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून यानंतर किमान तापमानाचा पारा देखील घसरेल.

हेही वाचा: विद्युत विभागाकडून आरोग्य विभागाला हस्तांतरित केलेल्या निधीवर शंका

सध्या अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पाऊस पडला. सर्वाधिक कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे १७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा ताप अधिक असल्याचे दिसून आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतात पुढील १५ दिवसांपर्यंत कोणत्याही पश्‍चिमी प्रकोपाची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) शक्यता नसून राज्यातही ‘शीत लहरीची’ शक्यता जाणवत नाही.

loading image
go to top