Rain
Rain esakal

Pune Rain Update : : पाऊस ऑगस्टमध्ये घेणार विश्रांती

जुलै महिन्यातील दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मॉन्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे.

पुणे - जुलै महिन्यातील दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मॉन्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या मॉन्सूनवर आता अल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता असून, ४ ते १० ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली.

रानडे इन्स्टिट्यूट येथे आयोजित पुणे विज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील मॉन्सूनची वाटचाल आणि भविष्यातील नैसर्गिक धोक्यांसदर्भात डॉ. होसाळीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशातील मॉन्सूवर अल निनो बरोबरच इतरही गोष्टींचा परिणाम होतो.

सध्या राज्यासह देशभरात जरी समाधानकारक पाऊस दिसत असला, तरी त्याचे वितरण असमान आहे. तसेच कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनाही आता वाढल्या आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

केवळ भारतीय हवामानशास्त्र विभागच नव्हे तर आंतरराष्ट्रीय हवामान संस्थाही असा अंदाज व्यक्त करत आहेत.’ हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालजवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन ते नऊ ऑगस्ट या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.

डॉ. होसाळीकर म्हणाले...

  • राज्यातील पाऊस समाधानकारक, पण वितरण असमान

  • अतिवृष्टीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत

  • हवामान बदलाचे धोके शांतपणे उग्र रूप धारण करतील

  • मराठवाड्यातील पाऊस जरी वाढत असला तरी १२५ वर्षांत ३० वर्षं दुष्काळ असतो

मॉन्सूनचा मुक्काम वाढला...

हवामान विभागाने मागील ५० ते ६० वर्षांतील मॉन्सूनचे वर्तन अभ्यासले असून, त्याचा भारतातील मुक्काम वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, असे डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. मॉन्सूनच्या आगमनास फारसा फरक नाही मात्र, परतण्याचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचेही नुकसान होत असून, येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असेल. राज्यातील पावसात नेहमीच अनिश्चितता पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com