Pune Weather Update
Sakal
पुणे
Pune Weather Update : पुणे आणि पिंपरीत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता
Pune Rain : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली, तर हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केले आहे.
पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

