पुणे - गेल्या दोन आठवड्यापासून पडत असलेला पाऊस शुक्रवारपासून विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील आठवडाभर आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे, गेले दोन आठवडे पुणेकरांना होणारा पाऊस व जागोजागी रस्त्यावर साचलेल्या पाण्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.