Pune rain traffic advisory today
Sakal
Pune roads affected by heavy rainfall: संततधार पावसामुळे बुधवारी सकाळी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली. कार्यालये, महाविद्यालयांची वेळ आणि पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेली संथ वाहतूक यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या.
गुगल मॅपवरील लाइव्ह ट्रॅफिकनुसार मध्यवर्ती पुण्यासह पूर्व, पश्चिम आणि उपनगरांतील अनेक मार्गांवर वाहने संथगतीने सरकत होती. काही ठिकाणी प्रवाशांना नेहमीपेक्षा अर्धा तास ते ४५ मिनिटे अधिक वेळ प्रवासासाठी खर्च करावा लागला.