श्रावणात घन निळा बरसला; पुण्यात दिवसभर पावसाची संततधार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

विकेंड आणि त्यात शनिवारी (ता.१५) स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्यामुळे लॉकडाउनमध्ये बंदिस्त असलेले पुणेकर जवळच्या ठिकाणी वर्षा सहल करण्याच्या तयारीत दिसत आहे.

पुणे : यंदाच्या मॉन्सूनमध्ये प्रथमच शहर आणि परिसरात सकाळपासूनच श्रावणसरींची संततधार पाहायला मिळाली. त्यामुळे ढगांच्या आड दडलेला सूर्याचे दिवसभर दर्शन घडणे दुरापास्त झाले होते. सकाळीच कामावर चाललेल्या चाकरमानाने योग्य तयारीने बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर चाललेल्या संततधारेमुळे शहरातील जनजीवन मंदावलेले होते. 

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीचा ठेंगा; वाचा काय आहे हे प्रकरण

विकेंड आणि त्यात शनिवारी (ता.१५) स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्यामुळे लॉकडाउनमध्ये बंदिस्त असलेले पुणेकर जवळच्या ठिकाणी वर्षा सहल करण्याच्या तयारीत दिसत आहे. पुढील दोन दिवस पावसाची कृपा अशीच असेल, असे हवामान खात्याने कळविले आहे.

परंतु, तीव्र स्वरूपाच्या पावसामुळे डोंगरावरून दरड, माती ढासळण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी साडे आठ वाजता घेतलेल्या निरीक्षणानुसार, मागील चोवीस तासात शहरात ७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, पण दिवसभरातील संततधारेमुळे पावसाचे हे रेकॉर्ड मोडेल अशी स्थिती होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rained continuously throughout the day in and around Pune city