esakal | ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीचा ठेंगा; वाचा काय आहे हे प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML_Bus

पीएमपीची बससेवा गेल्या २५ मार्चपासून शहरात बंद आहे. तेव्हापासून अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीच पीएमपीची बससेवा सुरू आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीचा ठेंगा; वाचा काय आहे हे प्रकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "दाताच्या दवाखान्यात तसेच आरोग्य तपासणीसाठी मला वरचेवर पुण्यात जावे लागते, पण पीएमपीच्या बस अजूनही बंद आहेत. कॅब परडवत नाही अन् रिक्षाचालक मनमानी करतात. वयोमानानुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनही चालविता येत नाही. आता आम्ही काय करायचे? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे सांगवीमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब टण्णू यांनी. तर दिव्यांगांनाही बसमध्ये सध्या प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे पीएमपीची काही प्रमाणात सेवा सुरू असूनही प्रवाशांना ठेंगा दाखविला जात आहे.

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

पीएमपीची बससेवा गेल्या २५ मार्चपासून शहरात बंद आहे. तेव्हापासून अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीच पीएमपीची बससेवा सुरू आहे. विमान, रेल्वे, एसटी, रिक्षा, कॅब सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठीही बससेवा सुरू करावी, असा प्रस्ताव पीएमपीने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिला आहे. परंतु, दोन्ही महापालिकांकडून सध्या या बाबत टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सुरू असलेल्या बसमधून वैद्यकीय कारणास्तवही पीएमपी प्रवास करून देत नाही. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि दृष्टिहिनांची गैरसोय होत आहे.

पुण्यात "बाप्पा आपल्या घरी" उपक्रमाव्दारे सोसायटीमध्ये मिळणार गणेश मूर्ती​

या बाबतची व्यथा मांडताना दिव्यांग सविता जाधव म्हणाल्या, पाच महिन्यांपासून पीएमपीची बस बंद असल्यामुळे दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रिक्षाने प्रवास करणे आम्हाला परवडत नाही. मला दवाखान्यात उपचारासाठी जायचे होते. मात्र मात्र तीन तास वाट बघूनही मला रिक्षा मिळाली नाही. शेवटी माझ्या नातेवाईकांना विनंती केल्याने त्यांनी मला त्यांच्या दुचाकीवर रूग्णालयात सोडले. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे तिनचाकी गाडी आहे, त्यांना अडचण येत नाही. मात्र तिनचाकी सायकल सर्वांना घेणे शक्‍य नसते.''

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा पुणे दौरा; सीईटीबाबत दिली महत्वाची माहिती​

तर अंध विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले, "बस बंद असल्यामुळे कोरेगाव पार्क येथे रोज कामावर येण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे. तसेच रिक्षा वेळेवर मिळत नाही, त्यामुळे मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे. हीच स्थिती सर्व दृष्टिहिन दिव्यांग बांधवांची आहे. त्यामुळे प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यादृष्टिने प्रयत्न करावेत.''

या बाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, "पीएमपीच्या बसला वाहतूक करण्यासाठी दोन्ही महापालिकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तवर बसमध्ये प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी विनंतीही दोन्ही महापालिकांकडे करण्यात आली आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top