कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

येत्या शुक्रवारी (ता. 23) आणि शनिवारी (ता. 24) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून, विदर्भात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

पुणे - अरबी समुद्राच्या पश्‍चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता. 23) आणि शनिवारी (ता. 24) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून, विदर्भात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात असलेल्या वाऱ्यांचे पश्‍चिम मध्य भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होणार आहे, तर आज त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उघडीप राहील. त्यामुळे राज्यात ऑक्‍टोबर हिट वाढणार असून, कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मॉन्सून माघार घेण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व खानदेशातील धुळे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. .

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rainfall in Konkan, Central Maharashtra