esakal | धरण क्षेत्रात पावसाची दिवसभरात विश्रांती 
sakal

बोलून बातमी शोधा

धरण क्षेत्रात पावसाची दिवसभरात विश्रांती 

खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरण पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पात 22 ऑक्‍टोबरअखेर 29.14 टीएमसी (99.94 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

धरण क्षेत्रात पावसाची दिवसभरात विश्रांती 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे -  खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सायंकाळी मुठा नदीतील विसर्ग कमी करून एक हजार 712 क्‍युसेक केला. प्रकल्पात आजअखेर 29.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत एक टीएमसीने अधिक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला धरणातून बुधवारी सायंकाळी एक हजार 712 क्‍युसेकने विसर्ग सुरू केला होता. त्यात वाढ करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विसर्ग तीन हजार 424 क्‍युसेक करण्यात आला. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता होती. परंतु खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोटात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे आज विसर्ग कमी केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत आजअखेर 12.12 टीएमसी पाणी सोडल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरण पूर्ण भरली आहेत. खडकवासला प्रकल्पात 22 ऑक्‍टोबरअखेर 29.14 टीएमसी (99.94 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी प्रकल्पात या तारखेस 28.14 टीएमसी (96.53 टक्के) पाणीसाठा होता. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर ः 3.69 (99.55) 
वरसगाव ः 12.82 (100) 
पानशेत ः 10.65 (100) 
खडकवासला ः 1.97 (100) kha

loading image