Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Raireśhwar Fort Shivpremi Action on Liquor Party : या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Shivpremi activists confront a group of outsiders allegedly organizing a liquor party near the historic Raireśhwar Fort, sparking tensions in the region.

Shivpremi activists confront a group of outsiders allegedly organizing a liquor party near the historic Raireśhwar Fort, sparking tensions in the region.

esakal

Updated on

Shivpremi Activists Take Action Against Liquor Party at Raireśhwar Fort:  पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात दारू पार्टी करणाऱ्या तीन परप्रांतीय मद्यपींना शिवप्रेमींकडून चांगलाच चोप दिला गेला आहे. शिवाय, या मद्यपींना किल्ल्याच्या परिसरातून हाकलून लावण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जाणाऱ्या शिवप्रेमींना रस्त्याच्या कडेला दारू पित बसलेले तीन युवक दिसले. त्यांची चौकशी केली असता ते परप्रांतीय असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संतप्त झालेल्या  शिवप्रेमींनी त्यांना याबाबत जाब विचारला आणि त्यांच्या दारूच्या बाटल्या फोडल्या व त्यांना चोप देत तेथून हाकलले.

 तर शिवप्रेमी नेमके कोण होते आणि  मद्यपान करणारे परप्रांतीय युवक नेमके कुठले आहेत, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होवू लागला आहे व त्याची चर्चाही सुरू आहे..

Shivpremi activists confront a group of outsiders allegedly organizing a liquor party near the historic Raireśhwar Fort, sparking tensions in the region.
Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात अशाप्रकारे मद्य प्राशन करण्याचा प्रकार समोर आल्याने, शिवप्रेमीं आणि गडप्रेमींकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com