राजभवनवर कोटीचा खर्च

राजभवनवर कोटीचा खर्च
Published on: 

दुष्काळात राजभवनाच्या
दुरुस्तीवर ३.७८ कोटींचा खर्च

दारे-खिडक्या, फरशी दुरुस्तीसाठी लाखोंची तरतूद; सात कामांसाठी निविदा

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : विदर्भातील शेतकरी दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करीत असताना राज्यपालांच्या लोकभवनातील दुरुस्तीच्या सात कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ३.७८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यामध्ये दारे-खिडक्यांच्या दुरुस्ती व पॉलिशिंगसाठी ५०.४२ लाख रुपयांचा अंदाजित खर्च ठेवण्यात आला आहे.
लोकभवन परिसरातील विविध बांधकामे आणि निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी दहा कामांसाठी ३.९५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. आता नव्याने सात कामांसाठी निविदा काढण्यात आल्याने दोन्ही टप्प्यांतील १७ कामांचा प्रस्तावित खर्च ७.७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नव्या निविदेत व्हीआयपी सूट क्रमांक एक आणि दोनमधील फरशीच्या कामासाठी ५०.४२ लाख रुपये, तर राज्यपालांच्या बंगल्यातील फरशी, भिंतींची सजावट आणि अन्य दुरुस्तीच्या कामांसाठीही ५०.४२ लाख रुपयांचा अंदाज आहे. वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरील छताची दुरुस्ती, फोर-इन-वन बंगल्याचे नूतनीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावरील छताच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५८.८२ लाख रुपये प्रस्तावित आहेत. मुख्य पाण्याच्या टाकीवरील सँडस्टोन प्लास्टर आणि पायऱ्यांच्या कामासाठी ५०.४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही सर्व कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कोट ----
लोकभवन परिसरातील बंगल्यांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे टाइल्स, सोफा, बेड यांसह अन्य साहित्याच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. राष्ट्रपती आणि पंतप्रधान विदर्भ दौऱ्यादरम्यान लोकभवन परिसरात मुक्काम करीत असल्याने ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.
- अमोल नासरे, कनिष्ठ अभियंता (प्रभारी), लोकभवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.