कोल्हापुरातला मंत्री पुराने कोथरुडपर्यंत वाहत आला : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

कोल्हापुरातला मंत्री पुराने कोथरुडपर्यंत वाहत आला अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. ते पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना चंपा हे नाव ठेवले असून, पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत आहेत. पण, या चंपाची चंपी मनसेचा उमेदवार करणार अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

पुणे : कोल्हापुरातला मंत्री पुराने कोथरुडपर्यंत वाहत आला अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. ते पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना चंपा हे नाव ठेवले असून, पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत आहेत. पण, या चंपाची चंपी मनसेचा उमेदवार करणार अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
 
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी मंडईत सभा घेतली. सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होती. या सभेत राज ठाकरे यांना पहिली सभा पावसामुळे रद्द झाल्याची आठवण सांगितले.

पटेलांचे स्मारक उभे राहिले मग आता शिवरायांचे स्मारक कधी?; राज ठाकरे यांचा सवाल

'कोल्हापूर सांगलीत महापूर आला. नुकसान झालं. सरकारमधील एक मंत्री थेट वाहत इथपर्यंत आले. कोणी गडगडत जातं. कोणी धडपडत जातं. हे थेट वाहत आले,' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. अजय शिंदेला शब्द दिल्याप्रमाणे मी आज सभा घेत आहे असेही राज यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticise on Chandrakant patil in pune