पुण्यातील महाआरतीत राज ठाकरेंचं केवळ 'मम'...

राज्यातील मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने 3 एप्रिलपर्यंत काढावे असा अल्टिमेटम दिला आहे.
Raj thackeray
Raj thackeraySakal

पुणे : राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आज हनुमान जयंतीचे (Hnuman Jayanti) औचित्य साधत राज ठाकरे यांच्याहस्ते पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात महाआरती आणि सामुहिक हनुमान चालिसा पठनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, महाआरतीच्यावेळी राज ठाकरे यांनी आरतीचा एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे या महाआरतीचे आयोजन नेमकं कशासाठी करण्यात आले होते असा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. (RaJ Thackeray MahaArti In Pune)

Raj thackeray
DC vs RCB Live : आरसीबीची खराब सुरूवात; विराटही धावबाद

राज्यातील मशिदींवरील भोंगे (Majjid Bhoge) राज्य सरकारने 3 मेपर्यंत काढावे अन्यथा त्यानंतर भोंगे लावून हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठन केले जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत दिला होता. त्यानंतर आज मारूती मंदिरात महाआरती आणि सामुहिक हनुमान चालिसाचे पठन करण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याचा श्रीगणेशा केल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

Raj thackeray
चंद्रकांतदादांनी शब्द फिरवला; एकनाथ खडसे, अमोल मिटकरींचा टोला

दिलीप वळसे पाटील म्हणाले की...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटमही दिला. महाराष्ट्रातील ही परिस्थिती पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. "लाऊडस्पीकरला परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेत परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणी त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल", असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. (Home Minister Dilip Walse Patil's big statement regarding laudspeaker on Masjid)

Raj thackeray
"PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवू नयेत, असे न्यायालयाने सांगितले. ज्या मशिदी किंवा मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे, त्यामधील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेने कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com