राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचावे

‘प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचा श्वास आहे. त्यांचे परखड लिखाण आणि प्रबोधनपर साहित्य महाराष्ट्राला नवी दिशा देणारे आहे.
raj thackeray
raj thackeraySakal

पुणे - ‘प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचा श्वास आहे. त्यांचे परखड लिखाण आणि प्रबोधनपर साहित्य महाराष्ट्राला नवी दिशा देणारे आहे. प्रबोधनकारांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रबोधनाचा महाजागर निर्माण होऊ शकतो, एवढी ताकद त्यांच्या साहित्यात आहे. मात्र ठाकरे कुटुंबात जन्माला येऊनही राज ठाकरे यांनी प्रबोधनकार यांचे साहित्य वाचले नाही, म्हणून ते चुकीच्या इतिहासकाराचे समर्थन करतात. त्यांनी वेळीच चूक दुरुस्त करून प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे,’ असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने करून दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पोहोचल्यामुळे समृद्ध तरुणांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठी मदत झाली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख आम्हाला पुरुषोत्तम खेडेकर यांच्यामुळे झाली. आम्ही प्रबोधनकारांच्या रक्ताचे वारस नसलो तरी विचारांचे वारसदार नक्की आहोत. कारण संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचा मूळ गाभा हे प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आहे. त्यामुळेच आम्ही परिवर्तनाची भाषा बोलत आहोत. हीच भाषा त्यांचे रक्ताचे वारसदार विसरले ही फार मोठी खंत आहे. राज ठाकरे यांनी ही चूक तत्काळ दुरुस्त करावी, अशी विनंती आहे,’’ असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

raj thackeray
पुणे : मनपा रुग्णालयात कोरोना लसीसाठी घेतले पैसे

प्रबोधनकारांचे साहित्य कुरिअरद्वारे पाठविणार

‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे चुकीच्या इतिहासाचा प्रचार करणारे तथाकथित इतिहासकार आहेत. ते जेम्स लेन समर्थक असून, जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीच्या प्रकरणात त्यांचा मोठा वाटा आहे. चुकीचा इतिहासात मांडणाऱ्याचे समर्थन करणे हा शिवद्रोह आहे,’’ असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण पुस्तक रूपात साहित्य कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहे,’’ असे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिंदे यांनी सांगितले. शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील रायकर, सोनू कुंजीर आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com