Vidhan Sabha 2019 : पावसामुळे राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, सायंकाळी मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठले. त्यामुळे ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, सायंकाळी मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठले. त्यामुळे ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली.

इडी नोटीस, त्यानंतर विधानसभा निवडणुकी उतरणार की नाही याबाबत निर्माण झालेला संभ्रम, त्यानंतर निवडणुकीत उतरणाच्या घेतलेला निर्णय या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रथमच पुण्यातील सरस्वती विद्यामंदिराच्या मैदानावर आज सायंकाळी सभा होणार होती. त्यामुळे या सभेत साहेब काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु मंगळवारी रात्री उशिरा शहरात जोरदार पाऊस झाला. सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि चिखल झाला होता. सभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मैदानावरील पाणी, चिखल काढण्यासाठी सर्व यंत्रणा लावली.

दिवसभर उन आणि ढगाळ असा वातावरणात सायंकाळी सभा होणार का याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. परंतु सायंकाळी सहा वाजता शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. बाजीराव रस्त्यावर गारा देखील पडल्यामुळे. सभा सात वाजता सुरू होणार होती. परंतु पाऊस थांबला नाही. त्यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पक्षाकडून अधिकृतपणे सभा रद्द करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र साहेब सभेच्या ठिकाणी भेट देणार असल्याची चर्चा सर्वत्र होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Pune Rally canceled due to rain