

Raj thackeray news
esakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कठोर कानउघडणी केली. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे, मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी उर्फ पिट्या यांना सोशल मीडिया पोस्टवरून थेट फटकारले गेले.