
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारयाद्यांवर काम करा. आतापर्यंत मतदारयाद्यांकडे आपण दुर्लक्ष केले होते. एका मतदारयादीवर तीन जणांची नियुक्ती करा. ते तिघेही त्याच मतदारयादीतील असणे आवश्यक आहे. मतदारांशी संपर्क करा. त्याचा सगळा अहवाल तयार करून, सप्टेंबरपर्यंत माझ्याकडे द्या, जे अहवाल देणार नाहीत, त्यांच्या जागेवर पर्यायी उमेदवार शोधला जाईल, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांना केली.