Pune Sextortion: पुण्यातील सेक्‍सटॉर्शन प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन; मोठी माहिती आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Sextortion

Pune Sextortion: पुण्यातील सेक्‍सटॉर्शन प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन; मोठी माहिती आली समोर

ऑनलाईन माध्यमाद्वारे ओळख झालेल्या तरुणीची नग्नावस्थेतील छायाचित्रे (सेक्‍सटॉर्शन) प्रसारीत करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे पुणे हादरून गेले होते. पुण्यात दोन तरुणानी आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसापुर्वी समोर आल्या होत्या. तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात एका तरुणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सेक्सटॉर्शनचे एकाच आठवड्यात दोन बळी गेले आहेत. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली असून त्यामागचे धक्कादायक वास्तव पुणे सायबर पोलिसांनी समोर आणले आहे. नग्न व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत पैशाची मागणी केल्यामुळे पुण्यातील दोन तरूणांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केली होती. यावर्षी सेक्सटॉर्शनच्या पुण्यात तब्बल १४०० तक्रारी दाखल असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

या घटनेसंदर्भात एकाला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान राजस्थानमधील गुरुकोठडी हे संपूर्ण गांव सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी तपसादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने याबाबत कबुली दिली आहे. या चौकशीदरम्यान राजस्थानमधील गुरुकोठडी हे संपूर्ण गांव सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: Sextortion: पुण्यात 2 आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर; सायबर पोलिसांचा अहवाल

या सर्व घटना चा पोलिस तपास करत होते. यादरम्यान पोलिसांना राजस्थानमधील या संपूर्ण घटनेमध्ये ही महत्वपूर्ण बाब उघडकीस आली आहे. या राजस्थानातील या गावातील 2500 हजाराहून अधिक लोक हे काम करतात. सोशल मिडियावर अकाऊंट काढून मुलांना फोटो पाठवण्यासाठी बोललं जातं. त्यानंतर त्यांना धमकी देऊन पैसे उकळण्यात येतात. अशी माहिती समोर आली आहे. पोलिस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.

टॅग्स :policepunecrime