Sextortion: पुण्यात 2 आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर; सायबर पोलिसांचा अहवाल

Sextortion
Sextortion esakal

पुणे : पुण्यात सेक्सटॉर्शनचे एकाच आठवड्यात दोन बळी गेले आहेत. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली असून त्यामागचे धक्कादायक वास्तव पुणे सायबर पोलिसांनी समोर आणले आहे. नग्न व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत पैशाची मागणी केल्यामुळे पुण्यातील दोन तरूणांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केली होती.

(Pune Sextortion Crime Latest Updates)

धनकवडी पाठोपाठ दत्तवाडी परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. शंतनु वाडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावर्षी सेक्सटॉर्शनच्या पुण्यात तब्बल १४०० तक्रारी दाखल असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

Sextortion
Pune: पुण्यातील पुरावरून माजी महापौरांनी राष्ट्रवादीला फटकारले, "अकलेचे तारे..."

दरम्यान, आजकाल अनेक तरूण सेक्सटॉर्शनचे बळी पडत असल्याचं समोर आलं आहे. एखाद्या अनोखी तरूणीकडून व्हिडिओ कॉल करून त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला असून पुण्यातील दोन तरूणांनी आपले जीव गमावले आहेत. तर याबाबत पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आणि असा प्रकार घडल्यास लगेच तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

हा प्रकार सध्या खूप वाढला आहे. एखाद्या सुंदर मुलीकडून फेसबुक रिक्वेस्ट पाठवली जाते. ती स्विकारल्यावर लगेच तिच्याकडून मेसेज येतात आणि व्हिडिओ कॉल करण्याची मागणी होते. व्हॉट्सअप नंबरही घेतला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉल येतो. त्यावेळी ती मुलगी नग्न असते. तरूणही याला मोहून व्हिडिओ कॉलवर बोलतात. पण त्यानंतर मुलीकडून हा कॉल रेकॉर्ड केला जातो आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे वसूल करण्यात येतात. त्यामुळे या प्रकारापासून सावध राहणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com