Pune Crime : राजस्थानमधील सायबर चोरट्यांच्या टोळीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune Crime : राजस्थानमधील सायबर चोरट्यांच्या टोळीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विविध बहाण्याने नागरिकांना आॅनलाइन गंडा घालणाऱ्या राजस्थानमधील सायबर चोरट्यांच्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. बजरंगलाल जगदीश नारायण मीना, राम लालाराम मीना, अनिलकुमार रामअवतार मीना, हरभजन दुंगाराम मीना, मोहनकुमार रामजीलाल (सर्व रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना ट्रान्झिट रिमांडद्वारे (प्रवासी कोठडी) पुण्यात आणण्यात आले आहे.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

या टोळीने पुण्यातील एका युवतीची फसवणूक केली होती. तिने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार युवती ही फोक आर्ट शिकवते. चोरट्यांनी तिला इन्स्टाग्रामवर मेसेज करून पारंपरिक राजस्थानी कला अभ्यासक्रमाचे ॲानलाइन प्रशिक्षण घ्यायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर या कोर्ससाठी जास्त फी भरल्याचा स्क्रीनशॉट पाठवून जागा भरलेली फी परत करण्यास भाग पाडून चोरट्यांनी १८ हजार रुपये उकळले होते.

हेही वाचा: कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी

सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिल्लीत अशा प्रकारे फसवणुकीचे गुन्हे करण्यात आल्याचे उघडकीस आले. दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधील चोरट्यांच्या टोळीला अटक केल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दिल्ली सायबर पोलिस विभागातील सहायक पोलिस आयुक्त रमण लांबा यांच्याबरोबर संपर्क साधण्यात आला. त्यांच्यामदतीने दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून पाच आरोपींना पुणे पोलिसांनी अटक करून त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक रवींद्र गवारी आणि राजकुमार जाबा यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top