Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND-vs-PAK-Babar-Azam
Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) पुढील 10 वर्षांच्या कालावधीतील आपला कार्यक्रम फिक्स केलाय. या काळात होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेचं यजमानपद कोणत्या देशाकडे असणार याचीही घोषणा करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा पुरुष क्रिकेट स्पर्धेतील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्या पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेनंतर 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद भारत भुषवणार आहे.

आयसीसीने आगामी महत्त्वपूर्ण स्पर्धेच्या यजमानपदाची घोषणा केल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्याच्या घडीला सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट संकटात अडकले आहे. न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला होता.

हेही वाचा: अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध अगोदरच ताणले गेले आहेत. त्यामुळे केवळ आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसते. आता पाकिस्तानाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद भुषवणार असल्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत सहभागी होण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसेल. या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. याला विरोध देखील होऊ शकतो. यावर तोडगा कसा निघणार हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा: भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण...

काही दिवसांपूर्वीच ICC चे हंगामी मुख्य कार्यकारी ज्योफ अलर्डिस यांना भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांना हा दोन्ही देशांचा अतर्गत प्रश्न असून आम्ही यात कोणताच हस्तक्षेप करणार नाही, असे म्हटले होते. एवढेच नव्हे तर दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत खेळतात याचा आनंदही व्यक्त केला होता.

loading image
go to top