

राजस्थानात १०५ जणांना
मिठाई खाल्ल्याने विषबाधा
एका विवाह सोहळ्यातील घटना
जयपूर, ता. ९ (पीटीआय) : राजस्थानमधील कोटपुतली-बहरोड जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात मिठाई खाल्ल्याने १०५ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. विराटनगर परिसरातील ढाणी गसकन गावात हा प्रकार घडला असून, बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लग्नासाठी रसमलाईसह विविध मिठाई तयार करण्यात आली होती. शुक्रवारी ही मिठाई ग्रामस्थांना वाटण्यात आली. ती खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. बाधितांना तातडीने अतेला येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी १६ मुले आणि १४ प्रौढांची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी शाहपुरा येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कपिल कुमार उपाध्याय यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सर्व रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्याने अनेकांना घरी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा विभागाने अन्नाचे नमुने ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.