राजस्थानच्या गाढवांना जेजुरीतील बाजारात उच्चांकी भाव

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

या यात्रेनिमित्त भरविण्यात येणारी जात पंचायत बंद केली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.
- वीणा सोनवणे, नगराध्यक्षा, नगरपालिका, जेजुरी

जेजुरी - पौष पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार येथे गाढवांचा बाजार भरला असून तो शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. या ठिकाणी सुमारे दोन हजार गाढवे विक्रीसाठी आली आहेत. राजस्थानमधील काठेवाडी जातीच्या गाढवांना २५ ते ४० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खंडोबा गडाच्या पायथ्याशी यानिमित्ताने राज्यातील भटके समाज बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. पावती न करता फक्त शब्दावर गाढवांचा बाजार चालतो. यासाठी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून व्यापारी आले. सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार समाजबांधवांनी गाढवे विक्रीसाठी आणली आहेत. 

'हुकुमशाहीला अहिंसेने उत्तर देऊ'

दातावरून होते पारख 
बाजारात गावाकडील गाढवांना पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गाढवांच्या दातावरून त्यांची किंमत ठरविली जाते. दोन दातांचे (दुवान) गाढव तरुण, चार दातांचे (चौवान) गाढव मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे वयात येणारे गाढव या अनुमानावरून त्यांचे दर ठरविले जात असल्याचे व्यापारी धोत्रे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan's donkey prices high in Jejuri market