राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्याने राजेंद्र पवार चर्चेत

थोर नेत्यांविषयी राज्यपाल कोशारी यांनी अक्षेपार्य विधाने केल्याने पुरस्कार स्वीकारण्यास नका
Rajendra pawar
Rajendra pawarSakal
Updated on

माळेगाव - राज्यशासनाच्यावतीने राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या हस्ते दिला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी नकार दिला. मध्यतरी छत्रपती शिवाजी महराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर नेत्यांविषयी राज्यपाल कोशारी यांनी अक्षेपार्य विधाने केल्याने महाराष्ट्राच्या अस्मियतेला धक्का पोहचला होता, अर्थात त्या दुखावलेल्या भावनांचा विचार करून मी पुरस्कार स्वीकारण्यास गेलो नाही, अशी परखड भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.  दुसरीकडे, राजेंद्र पवार यांच्या भूमिकेला पाटींबा देत अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, हे विशेष होय.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोज म्हसरुळ येथे राज्य सरकारचा कृषि पुरस्कार वितरण समारंभ आज संपन्न झाला. त्यामध्ये डॉ. पंजाबरा देखमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषीभूषण (सेंद्रीय शेती ) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी सेवारत्न पुरस्कार संबंधितांना प्रधान करण्यात आले. परंतु अॅग्रीकल्चरल डेव्हपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार घेण्यास जाहिर नकार दिला. परिणामी सर्वत्र एकच खळबळ उडाली.

`सकाळ`शी बोलताना पवार म्हणाले,`` शेती आणि शिक्षणाक्षेत्रात केलेल्या आजवरच्या कार्य़ाबद्दल मला शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहिर केल्याचा मनस्वी आनंद आहे. परंतु ज्यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळणार होता, ते राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी मध्येतरी छत्रपती शिवाजी महराज, महत्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर नेत्यांविषयी अक्षेपार्य विधाने केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मियतेला धक्का पोचला होता. खरेतर महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर आदी थोर नेत्यांना माननारा आहे. असे असताना राज्यपाल महोदयांच्या अक्षेपार्य़ विधानामुळे सर्वत्र आराजकता माजविणारे वातावरण तयार झाले होते. वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असता, किंवा कृषी विभागाने दिला असता तरी मी तो पुरस्कार आनंदाने स्वीकारला असला, अशा परखड शब्दात त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचे कारण स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com