rajesh pande
sakal
पुणे - आगामी विधान परिषदेच्या पुढील वर्षी होणाऱ्या पुणे पदवीधर विभागाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केली. पुणे पदवीधर विभागाच्या मागच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा तब्बल ४८ हजार मतांनी पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर तिसऱ्यांदा महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे.