'राजगड' पुन्हा कॉंग्रसकडेच, विरोधकांचे पानिपत

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
Sangram Thopate
Sangram ThopateSakal
Summary

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

भोर (पुणे) - अनंतनगर-निगडे (ता. भोर) नंतनगर-निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. आज मंगळवारी (ता. 31) येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये निवडणूकीची मतमोजणी पार पडली. कारखान्यातील 17 जागांपैकी कॉग्रेसचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर तीन गटांमधील ७ जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये कॉग्रेसचे 7, राष्ट्रवादीचे 3 आणि भाजपाच्या एका उमेदवाराचा समावेश होता. मतदानानंतर कॉग्रेसचे सातही उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 100 कर्मचा-यांच्या सहकार्याने मतमोजणी शांततेच पार पडली. सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरु झाल्यनंतर दुपारी तीन वाजता सर्व गटांचे निकाल हाती आले. निकालानंतर आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचा कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुलालाची उधळण करीत आमदार संग्राम थोपटे यांनी वाजतगाजत चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदारांचे आभार मानले. आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून सत्कार केला.

बिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे - गट क्रमांक ३ सारोळा-गुणंद-खंडाळा - किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण.गट क्रमांक ४ कापूरव्होळ-वेळू-हवेली - विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था - आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती जमाती - अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी - सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग - संदीप किशोर नगीने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.

मतदानानंतर विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे कंसात मिळालेली मते - गट क्र. १ भोर देवपाल - सुभाष मारुती कोंढाळकर (5 हजार 117) व उत्तम नामदेव थोपटे(4 हजार 998). गट क्रमांक २ येवली-हातवे बु - सुधीर चिंतामण खोपडे (4 हजार 649), सोमनाथ गणपत वचकल (4 हजार 870), पोपटराव नारायण सुके (4 हजार 942). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत - दिनकर सोनबा धरपाळे (5 हजार 277) व प्रताप धोंडीबा शिळीमकर(5 हजार 196). राष्ट्रवादीचे उमेदवार रामदास किसन गायकवाड, रामचंद्र पर्वती कुडले व पंडीत रघुनाथ बाठे यांचा पराभव झाला असून त्यांना अनुक्रमे 615, 639 व 405 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे अमृत विलास बांदल यांचा पराभव झाला असून त्यांना 884 मते मिळाली.

विरोधकांनी निवडणूक लादली

तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या पदाधिका-यांनी राजगड कारखान्याची निवडणूक हेतूपुरस्कर लादली असून ते पदाधिकारी स्वतः रिंगणात न उतरता इतरांना पुढे केले. खरे तर विरोधकांच्या स्वयंघोषीत पदाधिका-यांनी रिंगणात उतरायला हवे होते. कारखान्याच्या सभासदांनी विरोधकांना त्यांची जाग दाखवून दिली आहे. छाननीत उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर अपिलात राष्ट्रवादीच्या 11 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. परंतु तरीदेखील त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली आणि केवळ तीनच उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामुळे निवडणूकच्या खर्च होऊन कारखान्याला आर्थिक संकटात आणायचे होते. असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com