esakal | राजगुरुनगर व्यापारी महासंघाची पूरग्रस्तांना मदत
sakal

बोलून बातमी शोधा

rajgurunagar

राजगुरुनगर व्यापारी महासंघाची पूरग्रस्तांना मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजगुरुनगर : चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी, राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाने गावातील व्यापाऱ्यांकडून २ लाख ८३ हजार रुपयांचा निधी गोळा करून तो थेट पूरग्रस्तांना वितरित केला. पूरग्रस्तांना मदतीचे स्वरूप काय असावे यासाठी महासंघाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून आले. चिपळूण येथील लायन्स क्लब आणि स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधींना विचारुन लाभार्थी निवडण्यात आले.

महाड येथेही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि वृत्तपत्र प्रतिनिधींच्या सहकार्याने लाभार्थी निवडण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये रकमेचे धनादेश देण्यात आले. या निधीचे ५ सप्टेंबर रोजी वितरण करण्यात आले. नेमक्या गरजवंतांना निधी दिल्याची भावना महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

या निधी वाटपामधे माणिक होरे, स्वानंद खेडकर, विनय लोढा, बाळासाहेब मोरडे, मिलिंद आहेर, रंगनाथ सुतार, अमित गुजराथी, गणेश बेल्हेकर यांनी सहभाग घेतला. हा निधी गोळा करण्यासाठी नितीन शहा, चंदन खारीवाल, सागर बलदोटा, शाम चौधरी, सचिन कुलकर्णी, दिनेश सांडभोर, सतीश थिगळे, विजय सांडभोर, प्रशांत कर्नावट, संजय भंडारी, साहेबराव शेलार, अमोल सांडभोर, विपुल कर्नावट, गणेश काळे, मोहन जगदाळे, सुदाम कराळे यांसोबत राजगुरूनगर शहर व्यापारी महासंघाच्या सर्व व्यापारी प्रतिनिधी व सदस्यांनीही कष्ट घेतले. आवाहनास दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल महासंघाच्या वतीने सर्व दानशूर व्यापारी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

loading image
go to top