

New Shuttle Service ‘Rajmata Jijau’ Begins Operations from Pune to Baramati
sakal
-प्रसाद कानडे
पुणे: राज्य परिवहन महामंडळाची आधुनिक मात्र सामान्य प्रवाशांना परवडणारी ‘शटल’ दर्जाची बस ‘राजमाता जिजाऊ’ पुण्यात दाखल झाली आहे. बुधवार (ता. २५)पासून याची पुणे (स्वारगेट)- बारामती सेवेला प्रारंभ झाला. ही सेवा राज्यातील पहिली सेवा ठरली. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या बसचे लोकार्पण झाले. सेवेचा प्रारंभ मात्र पुण्यातून झाला. लवकरच पुणे विभागात या सेवेचा विस्तार होणार असून, यासाठी सुमारे २५० एसटी बस पुण्यात दाखल होणार आहेत.